https://samarpanedu.in

PM Suryoday Yojna 2024 : PM सूर्य घर मोफत वीज योजना ! वीज बिलापासून मुक्ती... करा ऑनलाईन अर्ज ...

PM Suryoday Yojna 2024

PM Suryoday Yojna 2024 : – नमस्कार मित्रानो, आज आपण PM सूर्य घर मोफत वीज योजनेविषयी ह्या Blog च्या माध्यमाने संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा Blog तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. ह्या योजनामध्ये नक्की काय आहे कोण – कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेसाठी पात्रता काय आहे तसेच महत्वाचं म्हणजे या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरता येईल याविषयी आपण सर्व माहिती Step By Step या पोस्टच्या माध्यमाणे पाहणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोफत विजेसाठी रूफटॉप सौरऊर्जा योजना सुरू केली आहे. पीएम मोदींनी या योजनेला ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ असे नाव दिले आहे. ही योजना मोदी सरकारच्या इतर रूफटॉप सौर योजनांपेक्षा किती वेगळी आहे ते जाणून घेऊया. केंद्र सरकारच्या 75,000 कोटींहून अधिकच्या ह्या Project चे उद्दिष्ट आहे दरमहिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवण्याचे तसेच 1 कोटी घरांना लाईट देण्याचे उद्दिष्टे या योजनेचे आहे.

पीएम मोदींच्या म्हणण्यानुसार, ‘या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष सबसिडी थेट लोकांच्या बँक खात्यात दिली जाईल. याशिवाय, मोठ्या प्रमाणात सवलतीचे बँक कर्ज देखील दिले जाईल. जनतेवर खर्चाचे ओझे पडणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेईल. सर्व लाभधारकांना राष्ट्रीय Online Portal शि जोडले जाईल जे पुढील लागणाऱ्या संपुर्ण सुविधा प्रदान करेल. यामुळे हि योजना राबवण्यास साईस्कर ठरेल तसेच ही योजना तळपायापर्यंत लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

ट्विटरवर ट्विट करताना पीएम मोदींनी लिहिले आहे की, ही योजना अधिक उत्पन्न, कमी वीज बिल आणि लोकांसाठी रोजगार निर्मितीचे उत्तम साधन ठरेल. मी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषकरून: तरुणांना pmsuryagarh.gov.in वर अर्ज करून पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला बळकट  व Strong करण्याचे आवाहन करतो.

PM Suryoday Yojna 2024 ! अर्ज कसा करावा.

PM Suryoday Yojna 2024 – रूफटॉप सोलर सिस्टीम Install करण्यासाठी, तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. या वेबसाइटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला वरच्या डाव्या बाजूला Apply for rooftop solar चिन्हावर क्लिक करावे लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ६ Step मध्ये माहिती द्यावी लागेल. 

1) Step 1 जसे- तुम्ही कोणत्या राज्याचे रहिवासी आहात, तुम्ही कोणत्या वीज कंपनीचे ग्राहक आहात, ग्राहक क्रमांक ( Consumer Number ) कोणता आहे, आधारशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी इ. माहिती न चुकता तुम्हाला द्यावी लागणार आहे. 

2)  मध्ये तुम्ही ग्राहक क्रमांक आणि मोबाइल नंबरसह लॉग इन करू शकता आणि नंतर घरावरील सौर पॅनेलसाठी फॉर्म भरू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या घराची आणि स्वतःची संपुर्ण माहिती न चुकता भराल. 

3) 3rd Step मध्ये तुम्हाला डिस्कॉम कंपन्यांकडून मंजुरी मिळेल आणि नोंदणीकृत विक्रेता कंपन्या (Solar Panel Distributer Company) तुमच्याशी संपर्क साधतील.

4) 4th Step मध्ये प्लांट बसवल्यानंतर, तुम्हाला पूर्ण योजना तपशीलांसह सबमिट मीटरमध्ये सबमिट करावी लागेल. 

5) Step -५ मध्ये तुमच्या जागी नेट मीटर बसवले जातील आणि डिस्कॉम कंपनीने तपासणी केल्यानंतर तुमचे प्रमाणपत्र पोर्टलवर दिले जाईल. शेवटच्या चरण-

6) Step 6 मध्ये तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल. यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती आणि रद्द केलेला चेक किंवा बँक खात्याचा पासबुक या पोर्टलवर सबमिट करावा लागेल. अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात ३० दिवसांच्या आत जमा केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की ही योजना प्रत्येकासाठी नाही. ही योजना फक्त गरीब बेरोजगारांसाठी तसेच ज्यांचे वार्षाक  उत्पन्न एक लाखाखली आहे. Government Job करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत.

 

पीएम सुर्योदय योजना सुरू करण्याचे महत्वाचे उद्दिष्टे काय आहे.

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी PM सूर्योदय योजना 2024  हि योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश देशातील गरीब कुटुंबांचा त्यांच्या घरावर सौर पॅनेल बसवून वीज खर्च कमी करणे किंवा टाळणे हा आहे. यासाठी सरकार एक कोटी नागरिकांना अनुदानही देणार आहे. वाढत्या वीज बिलांमुळे त्रासलेल्या देशातील नागरिकांना आता पीएम सूर्योदय योजनेतून मोठा दिलासा मिळणार आहे.

 

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे फायदे काय आहेत?

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान सूर्योदय योजना जाहीर केली.

2) या योजनेद्वारे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांवर सौर पॅनेल बसवले जातील व त्यांच्या घरात लाईटीची व्यवस्था केला जाईल.

3) या योजनेच्या माध्यमातून सोलर पॅनल बसविल्यास नागरिकांचा वीज बिलाचा खर्च कमी होऊन दैनंदीन जिवनात वाढ होऊ शकतो.

4) देशातील एक कोटी गरीब व मध्यमवर्गीय लोकांना पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ मिळेल.

5) या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे वीज बिल कमी होणार नाही तर ऊर्जा क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवले जाईल.

 

पीएम सूर्योदय योजना 2024 साठी पात्रता काय आहे?

जर तुम्हाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला सरकारने ठरवून दिलेले काही पात्रता निकष लक्षात ठेवावे लागतील जे खालीलप्रमाणे आहेत –

पीएम सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

या योजनेचा फायदा गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना होणार आहे.

अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे स्वतःचे निवासस्थान असणे आवश्यक आहे.

ह्या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी, अर्जदाराकडे लागणारी महत्त्वाची संपुर्ण कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे.

PM Suryoday Yojna 2024 ! पीएम सूर्य घर मोफत वीज योजना 2024 बद्दल थोडक्यात माहिती

योजनेचे नावपीएम सूर्य घर योजना
योजना कोणी सुरू केली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
लाभार्थी कोण आहेदेशातील गारे-गरीब नागरिक
उद्देश काय आहेमोफत वीज देऊन घरांना प्रकाश देणे
फायदा काय आहे300 युनिट मोफत वीज
बजेट रक्कम किती आहे
75,000 कोटी रुपये
अर्ज प्रक्रिया कशी करावीऑनलाइन पद्धतीने

PM Suryoday Yojna 2024 Form भरण्यासाठी चालील Step Folow करा

१) सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या website https://pmsuryaghar.gov.in वर क्लिक करून Open करायये आहे उघडा

२) त्यानंतर Home Page वर आल्यानंतर तुम्हाला Right Side ला Apply for Rooftop Solar वर क्लिक करा

३) तुम्हाला या तपशीलांसह प्रथम नोंदणी करावी लागेल – आपले राज्य, वीज वितरण कंपनी, वीज ग्राहक क्रमांक (Consumer Number), मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी ई. माहिती भरावी लागेल

4) एकदा पूर्ण झाल्यावर, पुढे जाण्यासाठी तुमच्या मोबाइल नंबरसह लॉग इन करा.

५) तुम्ही आता रूफटॉप योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्जाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला बँक तपशील सबमिट करावा लागेल.

6) एकदा तुम्हाला तुमच्या Form ला मंजूरी मिळाल्यावर, तुमच्या डिस्कॉममध्ये नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करावा लागेल.

7) एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा

8) नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार केले जाईल.

9) एकदा तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाला की. पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक किवा बँक पासबुक सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी ३० दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 

प्रश्न 1. प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे?

उत्तर: – PM सूर्योदय योजना 2024 ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना आहे, या योजनेद्वारे देशातील नागरिकांच्या त्यांच्या घरांवर सौर पॅनेल बसवले जातील. त्यामुळे त्यांना वीजबिलात सवलत किंवा सुट मिळणार असून, सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदानही देणार आहे.

 

प्रश्न 2. प्रधानमंत्री सूर्योदय योजना कधी व कोणच्या हस्ते जाहीर करण्यात आली?

उत्तर: – आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

 

प्रश्न 3. देशातील किती लोकांना प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ मिळेल?

उत्तरः – आम्ही तुम्हाला सांगतो की पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ देशातील गरीब व मध्यमवर्गा मधील एक कोटी लोकांना मिळणार आहे.

Scroll to Top