Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024 ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ! पात्रता, लागणारे कागदपत्रे, अर्ज कसा भरावा संपुर्ण माहिती पाहा !
Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024 :-
नमस्कार मित्रानो, आज आपण ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनायोजनेविषयी ह्या Blog च्या माध्यमाने संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ह्या योजनामध्ये नक्की काय आहे कोण – कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेसाठी पात्रता व अपात्रता काय आहे तसेच महत्वाचं म्हणजे या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरता येईल याविषयी आपण सर्व माहिती Step By Step या पोस्टच्या माध्यमाणे पाहणार आहोत.
महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” लागू होत आहे. त्याच्या अंतर्गत 21 ते 60 वर्षांची पात्र असलेल्या महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील. त्यासाठी महाराष्ट्र सरकार ने 46,000 करोड रुपयांचा निधी मंजुर केला गेला आहे.
जसे की, ‘लाडली बहन योजना’ मध्य प्रदेशातही लागु आहे. महिलांना आर्थिक रूपाने मदत करण्यासाठी महिलांना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1250 रूपये दिले जातात. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रा मध्ये सुद्धा या योजनेची सुरूवात झालेली आहे. या योजनेच्या स्वरूपात प्रत्येक महिलांना आर्थिक स्वरूपात मदत या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला ₹ 1500 पर्यंत दिले जाणार आहे.
महाराष्ट्र सरकार ने शुक्रवार दिनांक 28 जून रोजी मानसुन सत्रात अंतरिम बजेट 2024 सादर केले, ज्यामध्ये महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. केंद्र सरकार ने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ नावाने एक नवीन योजना सुरू केली आहे.
मुंबई: महाराष्ट्र सरकार ची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत अर्ज 1 जुलै सोमवार रोजी सुरू होईल. ही योजना पात्र महिला 15 जुलैपर्यंत अर्ज करू शकणार वित्त मंत्री अजित पवार यांच्या द्वारे प्रस्तुत बजेटमध्ये या योजनेची घोषणा केली आहे, 21 ते 60 वर्षांपर्यंत महिला आणि 1,500 रुपये प्रत्येक महिला प्रत्येक महिन्याला येत राहतील. तसेच शासन GR नसार 16 जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशीत केला जाणार आहे. ज्यावर शासन निर्णयानंतर अंतीम यादी ऑगस्ट महिन्यात येणार आहे. त्याच्या नंतर 14 अगस्ट ला पात्र महिलांना 1,500 रुपये बँकेत ट्रान्सफर केले जातील. त्याच्या नंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे ट्रांसफर होईल.
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल.
शासन निर्णय काय आहे:-
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आकण कुटुंबातील त्यांची निर्णायक क्षमता मजबुत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश :-
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मीतीस चालना देणे.
- त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वणसन करणे.
- राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.
योजनेचे लाभार्थी:-
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
पात्रता:-
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे
- उत्पन्नाचे रू 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे.
- बँकेमध्ये सदर महिलेचे नावे खाते असावे.
- रेशन कार्ड मध्ये सदर महिलेचे नाव अंतर्भूत असावी
- किमान वयाची 21 वषे पुर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पुर्ण हाईपर्यंत
अपात्रता :-
- ज्यांच्या कुटूंबाचे एकत्रित वार्षीक उत्पन्न रु.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता (IT Return) आहे. ती महिला लाभार्थी अपात्र ठरेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमीत/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेत्तन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामर्फत राबहवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल ती महिला लाभार्थी अपात्र ठरेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यामान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ती महिला लाभार्थी अपात्र ठरेल.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024 :- Important Date:
अ.नं | उपक्रम | तारखा |
1. | अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात | 1 जुलै, 2024 |
2. | अर्ज प्राप्त करण्याचा शेवटची तारीख | 30 ऑगस्ट 2024 |
3. | तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक | Update Soon |
4. | तात्पुरत्या यादीवरील तक्रार/हरकती प्राप्त करण्याचा कालावधी | Update Soon |
5. | तक्रार/हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी | Update Soon |
6. | अंतिम यादी प्रकाशन दिनांक | Update Soon |
7. | लाभार्थी निधी हस्तांतरण तारीख | Update Soon |
Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024 Important Links –
GR Notifications | Click Here |
New GR | Click Here |
Official Website | Click Here |
हमीपत्र | Click Here |
Online Apply | Click here |
Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojna 2024 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे :-
1. आधार
2. उत्पन्नाचा दाखला किंवा 15 वर्षा अगोदरचे रेशनकार्ड
3. जन्माचा दाखला/टि.सी. झेरॉक्स /डोमेसाईल प्रमाणपत्र/ निवडणुक ओळख पत्र (Voting Card)
4. रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत असावी
5. लाभार्थी नावाने बँक पासबुक झेरॉक्स प्रत
6. सदर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.