महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 GR पाहा । किती पदे भरणार । पयोमर्यादा काय आहे । परिक्षा शुल्क । लागणारे कागदपत्रे । संपुर्ण माहिती पहा ।
महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26 GR ( Maharashtra Police Bharti 2025-26 ) ची जाहिरात आलेली आहे. यावर्षी एकूण 15,631 जागांसाठी भरती होणार आहे. ही महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरूणींसाठी अत्यंत महत्वाची सुवर्णसंधी आहे.
वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद १५,६३१ रिक्त पदे (१०० टक्के) भरण्यास वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देण्यात येत आहे.
३. सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०४.०५.२०२२ व दि.२१.११.२०२२ च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन २०२४-२५ ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Maharashtra Police Bharti 2025-26 GR 👉 Click Here 👈
वयोमर्यादा (Age Criteria)
Maharashtra Police Bharti 2025-26मध्ये होणाऱ्या भरतीत सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून यणाऱ्या भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.
परिक्षा शुल्क (Exam Fees)
Maharashtra Police Bharti 2025-26भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.४५०/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.३५०/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Maharashtra Police Bharti 2025-26 पदांचा तपशिल खालील प्रमाणे
| अ.क्र | पदनाम | रिक्त पदांची संख्या |
| 1. | पोलीस शिपाई | 12,399 |
| 2. | पोलीस शिपाई चालक | 234 |
| 3. | बॅण्डस्मन | 25 |
| 4. | शसस्त्र पोलीस शिपाई | 2,393 |
| 5. | कारागृह शिपाई | 580 |
| एकुण | 15631 |
Maharashtra Police Bharti 2025-26 भरतीची माहिती
- एकूण पदे : 15,631
- पदाचे नाव : पोलिस शिपाई (Police Constable)
- शैक्षणिक पात्रता : किमान 12वी उत्तीर्ण
- भरती करणारा विभाग : महाराष्ट्र राज्य सरकार
Maharashtra Police Bharti 2025-26 भरतीसाठी महत्वाच्या तारखा
- Online अर्जाची सुरुवात : लवकरच जाहीर होईल
- शेवटची तारीख : अधिकृत जाहिरातीमध्ये प्रसिद्ध होईल
- शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा वेळापत्रक : नंतर जाहीर होईल
निवड प्रक्रिया
पोलिस भरती 2025 साठी खालील टप्पे असतील :
- शारीरिक चाचणी (Physical Test)
- लेखी परीक्षा (Written Exam)
- कागदपत्र पडताळणी (Document Verification)
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (GK & Current Affairs)
- अंकगणित व बुद्धीमापन (Maths & Reasoning)
- मराठी व इंग्रजी भाषा (Marathi & English)
- तांत्रिक व संगणक ज्ञान (Technical & Computer Knowledge)
Maharashtra Police Bharti 2025-26 अर्ज करण्यासाठी लागणारे Document
- आधार कार्ड
- 10/12 मार्कशिट/प्रमाणपत्र
- Graduation Marksheet असेल तर
- जातीचा दाखला
- Domicile Certificate
- फोटो
- सही
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
महत्वाच्या सूचना
- जाहिरात नीट वाचून घ्यावा व त्यानंतरच अर्ज सादर करावा
- शारीरिक क्षमतेसाठी आधीपासून तयारी सुरु करावी
- अर्जातील माहिती नचुकता अचूक माहीती भरावी
- अर्ज करण्यापुर्वी लागणारे संपुर्ण कागदपत्रे सोबत ठेवावे
- अर्ज एकवेळा Submit केल्यानंतर Edit करता येणार नाही.








