Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 | कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज सुरू…..
Kusum Yojana Maharashtra 2023 |Online Application Starts 2023 | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 | महाउर्जा कुसुम योजना |कुसुम सोलर पंप महाराष्ट्र रजिस्ट्रेशन | PM Kusum Solar Pump Yojana Maharashtra| | कुसुम योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, पात्रता, लाभ संपूर्ण माहिती मराठी | कुसुम सौर कृषी पंप योजना | कुसुम योजना महाराष्ट्र | सोलर पंप योजना महाराष्ट्र |
शेतकऱ्यांना खेडया-पाडयात व ग्रामीण भागात शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. काही ठिकाणी पाणी असूनही वीज नसल्याने किंवा लोडशेडींमुळे शेतीला पाणी देणे शेतकऱ्यांना कठीण होत आहे. केंद्र सरकारने यावर तोडगा म्हणून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना 2023 ही योजना सुरु केली आहे.
शेतीमध्ये सिंचन ही गंभीर समस्या बनली आहे. मात्र, याला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक योजनाही राबविल्या आहेत. यापैकी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना (पीएम कुसुम योजना) हि आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौरपंप दिले जातात.
या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सुटू शकतात. त्याचप्रमाणे यासोबतच शेतकऱ्यांना योग्य वेळी सिंचन मिळाल्यास शेतीतील उत्पादनातही वाढ होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफाही वाढण्यास मदत होईल.
केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
शासनाचे शेतीविषय हे अभियान महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत अर्जदारांचे On-line अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर अनुज्ञेयता तपासून राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंपावर केंद्र सरकारकडून 30 टक्के, राज्य सरकारकडून 30 टक्के आणि इतर वित्तीय संस्थांकडून 30 टक्के अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च स्वतः भरावा लागणार आहे.
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 कुसुम सोलर पंप योजना 2023 अनुदान
Solar Pump Capacity | Solar Pump Price | General Category (after subsidy) | Scheduled Caste/Scheduled Tribe Category (after subsidy) |
3 HP | Rs. 1,93,803 | Rs. 19,380 | Rs. 9,690 |
5 HP | Rs. 2,69,746 | Rs. 26,975 | Rs. 13,488 |
7.5 HP | Rs. 3,74,402 | Rs. 37,440 | Rs. 18,720 |
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजनेची उद्दिष्टे
सौर ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देणे जेणेकरून उर्जेच्या पारंपारिक स्त्रोतांवरील अवलंबुन राहणे कमी होईल.
सोलर पंप बसवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व अनुदान देणे.
सिंचनासाठी सतत आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा सुनिश्चित करणे आणि उत्पादनात सुधारणे करणे.
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून पर्यावरण स्वच्छ आणि हरित बनवणे.
शेतकऱ्यांचा विज बिल खर्च कमी करणे आणि वीज निर्मितीद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवणे.
पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
रेशन कार्ड
जातीचा दाखला (ST. Category)
आधार कार्ड
बँक पासबुक
मोबाइल नंबर
7/12 उतारा –
शेतात विहिर/कुपनलिका असल्यास 7/12 च्या उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक
नावे एकापेक्षा जास्त असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. 200/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागेल.
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 कुसुम योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र कुसुम सौर पंप योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होमपेज ओपन होईल,
आता तुम्हाला सर्वप्रथम या योजनेंतर्गत तुमचे गाव पात्र आहे का हे तपासावे लागेल.
त्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या सेफ व्हिलेज लिस्ट या पर्यायावर क्लिक करा,
या लिस्ट मध्ये तुम्हाला तुमच्या गावाचे नाव पाहावे लागेल, यामध्ये तुमच्या गावाचे नाव असेल तर तुम्ही डीझेल पंप नाही हा पर्याय निवडून अर्जाची पुढील प्रक्रिया करू शकता.
या लिस्ट मध्ये जर तुमच्या गावाचे नाव नसेल तर डीझेल पंप वापरत असल्याचा पर्याय निवडून त्याठिकाणी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करू शकता.
जर तुम्हाला पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करून ते ऑनलाइन करू शकता.
सर्वप्रथम, तुम्ही या महाराष्ट्र पीएम कुसुम योजना नोंदणी लिंकवर क्लिक करा. https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
तुमच्या समोर एक नोंदणी पृष्ठ उघडेल. या पेजवर तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे. नवीन किंवा बदली डिझेल पंपासाठी विनंती [जर नसेल तर]
तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल जिथे शेतीची जमीन आहे, यानंतर तालुका निवडावा लागेल आणि गावाचे नाव,
आता तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करा त्यानंतर पुढील रकान्यात तुम्हाला जाती संबंधित माहिती भरावी लागेल, समोर असलेल्या पर्यायांपैकी निवडून पुढे आपला ई-मेल आयडी प्रविष्ट करा.
यानंतर पुढील पेजवर तुम्हाला नोंदणीसाठी 100 रुपये ऑनलाइन फीस भरावी लागेल.
आता यानंतर तुमच्या मोबाइलवर युजरनेम आणि पासवर्ड पाठवल्या जाईल, जे वापरून तुम्ही पोर्टलवर लॉगिन करायचे आहे.
वेबसाईटवरील सूचनांनुसार तुमची कागदपत्रे अपलोड करा व पुढील प्रक्रिया पुर्ण करा.
संपुर्ण प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर सबमीट बटक क्लिक करा.