About us Page
About us Page ! नमस्कार मित्रांनो, खरं तर सुरवात खुप आधीपासुन कारायला पाहिजे होती. कारण, आजचं युग हे जलद गतीने प्रगतीकडे धावणार युग आहे. ह्या युगात आदिवासी समाजातील तरूण पिढी हि मागे राहुन चालली आहे. ग्रामीण भागातील असल्या कारणाने त्यांना शिक्षणाविषयी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. डोंगराळ भाग असल्या कारणाने खेडयापाडयातील अवस्था वाईट आहे. आजही काही असे गावे आहेत जिथे लाईटची सोय नाही, रस्ते नाही, अशा कारणांमुळे त्यांना मार्गदर्शन मिळणे कठीण आहे. ह्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण आदिवासी भागात मोठया प्रमाणात आहे. About Myself मी यश गावीत नंदुरबार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात वस्ती करणारा साधारण व्यक्ती, माझं शिक्षण 10 पर्यंतच हे नंदुरबार येथील S. A. Mission High school मध्ये पुर्ण करून नाशिक येथील KTHM College Nashik मध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेलो.
सरकारी नोकरी करण्याच्या हेतुने पुढचं शिक्षण घेत होतो. परंतु लहाणपनापासुनच कॉम्प्युटरची आवड असल्या कारणाने कॉम्प्युटर क्षेत्रात जाऊन आपल्या जिल्ह्यातील मुलांना कॉम्प्युटरच शिक्षण द्यावं ह्या हेतुने आम्ही 2016 साली शिक्षण पुर्ण करून समर्पण कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेची स्थापना केली.समर्पण संस्थेच्या माध्यमाने आम्ही गरजु मुलांना कॉम्प्युटरचं प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. प्रथम गावोगावी फिरुन मुलांना कॉम्प्युटर बद्दल माहिती पुरवीली आणि आम्हाला बऱ्यापैकी यश ही मिळाले. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना घरची परिस्थिती गरिबीची असल्या कारणाने तेवढे ही करता येईना. आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या TRTI Pune (Tribal Research and Training Institute Pune) यांच्या माध्यामाने आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्याचे कामे आमच्या संस्थेमार्फत सुरुवात केलेली आहे.
Domestic Data Entry Operator, Web Developer, Media Developer, Junior Software Developer, Domestic Biometric Data Operator, and Domestic IT Helpdesk Attendant, Tally, Graphics Design ई. प्रकारचे कोर्सेस चे प्रशिक्षण देण्याचे चालु आहे. About the work of samarpan
आमच्या संस्थेत कॉम्प्युटर प्रशिक्षणच नव्हे, तर त्यांना योग्य शैक्षणिक मार्गदर्शन करून नोकरी पर्यंतचा प्रवास कसा करावा याच्या विषय मार्गदर्शन करण्याचे कामे आमच्या संस्थेमार्फत राबिवीण्यात येतात.आदिवासी समाज हा मागासवर्गीय असुन खेडयापाडयात लाईटीची सोय तसेच चांगले मोबाईल व कॉम्प्युटर, इंटरनेट ची सोय नसल्या कारणाने मुलांना शिक्षणा विषयी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. खेडयापाडयातील गोर-गरीब मुलांना मोफत शिक्षणाविषयी व नोकरी विषयी योग्य मार्गदर्शन केली जातात. ह्या संस्थेमार्फत आम्ही 15000+ पेक्षा जास्त मुलांना योग्य मार्गदर्शन केले आहे. तसेच 15000 पेक्षा जास्त मुलांना कॉम्प्युटर चे प्रशिक्षण देऊन त्याचं भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न केला आहे. आताचे युग हे ऑनलाईनचं असल्या कारणाने जास्तीत जास्त मुलांना रोजगारासाठी योग्य शिक्षणासाठी मार्गदर्शन करता यावं म्हणुन samarpanedu.in हया वेबपेज ची स्थापना केली. आणि ह्या वेबपेज द्वारे आम्हाला जास्तीत जास्त गरजु मुलांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्याचे कामे चालु आहे. कॉम्प्युटरचं शिक्षण आम्ही आमच्या संस्थेत मुलांना देऊन त्यांना त्यांची जिवनशैली कशी घडवावी याबद्दल मार्गदर्शन करत असतो. माजीक ओढ असल्या कारणाने वेगवेगळया ठिकाणी आमचे केंद्र स्थापन करून आम्ही आमच्या संस्थेमार्फत प्रशिक्षण व महिती पुरवण्याचे काम चालु आहे. आमची प्रशिक्षण केंद्रे : Samarpan College of computer education Navapur, Nandurbar – 425417
Bless college of computer education Visarwadi, Navapur, Nandurbar – 425426
Seva Computer Education Nandurbar – 425412
Rahobat Computer Institute dhadgaon, Nandurbar – 425414
Vaishnavi Computer Education akkalkuwa, Nandurbar – 425419 Computer Courses ➡️ Click Here
👉 आमच्या वेबसाईला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.👈
About us Page :- |