About us www.samarpanedu.in

नमस्कार मित्रांनो,

खर तर सुरवात खुप आधिपासुन कारायला पाहिजे होती कारण, आजच युग हे जलद गतीने प्रगतीकडे धावणार युग आहे. ह्या युगात आदिवासी समाजातील तरूण पिढी हि मागे राहुन चालली आहे. ग्रामीण भागातील असल्या कारणाने त्यांना शिक्षणाविषयी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. डोंगराळ भाग असल्या कारणाने खेडयापाडयातील अवस्थ वाईट आहे. आजही काहि असे गावे आहेत जिथे लाईटीची सोय नाही, रस्ते नाही, अशा कारणांमुळे त्यांना मार्गदर्शन मिळणे कठीण आहे  ह्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण आदिवासी भागात मोठया प्रमाणात आहे.

मी यश गावीत नंदुरबार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात वस्ती करणारा साधारण व्याक्ती, माझ शिक्षण 10 पर्यंतच हे नंदुरबार येथील S.A.Mission High_school मध्ये पुर्ण करून नाशिक ऐथील  KTHM College मध्ये पुढच शिक्षण घेण्यासाठी गेलो. सरकारी नोकरी करण्याच्या हेतुने पुढच शिक्षण घेत होतो. परंतु लहाणपनापासुनच कॉम्प्युटरची आवड असल्या कारणाने  कॉम्प्युटर क्षेत्रात जाऊन आपल्या जिल्ह्यातील मुलांना कॉम्प्युटरच शिक्षण द्याव ह्या हेतुने आम्ही 2016 साली शिक्षण पुर्ण करून समर्पण कॉम्प्युटर एज्युकेशन  संस्थेची स्थापणा केली. ह्या संस्थेच्या माध्यमाने आम्ही गरजु मुलांना कॉम्प्युटरच प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. गावोगावी फिरुन मुलांना कॉम्प्युटर बद्धल माहिती पुरवीली आणि आम्हाला बऱ्यापैकी यशही मिळाल परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना घरची परिस्थिती गरिबीची असल्या कारणाने तेवढही करता येईना. आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यासाठी  आदिवासी विकास विभागाच्या TRTI Pune (Tribal Research and Training Institute Pune) यांच्या माध्यामाने आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्याचे कामे आमच्या संस्थेमार्फत सुरुवात केली. Domestic Data Entry Operator, Web Developer, Media Developer, Junior Software Developer, Domestic Biometric Data Operator, and Domestic IT Helpdesk Attendant, Tally, Graphics Design ई. प्रकारचे कोर्सेस चे प्रशिक्षण देण्याचे चालु आहे.

आमच्या संस्थेत कॉम्प्युटर प्रशिक्षणच नव्हे तर त्यांना  योग्य शैक्षणीक मार्गदर्शन करून नोकरी पर्यंतचा प्रवास कसा करावा याच्या विषय मार्गदर्शन करण्याचे कामे आमच्या संस्थेमार्फत राबिवीण्यात येतात. आदिवासी समाज हा मागासवर्गीय असुन खेडयापाडयात लाईटीची सोय तसेच चांगले मोबाईल व कॉम्प्युटर, इंटरनेट ची सोय नसल्या कारनाने मुलांना शिक्षणा विषयी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. खेडयापाडयातील गोर-गरीब मुलांना मोफत शिक्षणाविषय व नोकरी विषयी योग्य मार्गदर्शन केली जातात.

ह्या संस्थेमार्फत आम्ही 11500 पेक्षा जास्त मुलांना सल्ला देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. तसेच 15000 पेक्षा जास्त मुलांना कॉम्प्युटर चे प्रशिक्षण देऊन त्यांच भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न केला आहे. आताचे युग हे ऑनलाईनच असल्या कारनाने जास्तीत जास्त मुलांना रोजगारासाठी मार्गदर्शन करता यावा म्हणुन samarpanedu.in हया वेबपेज ची स्थापना केली.आणि ह्या वेबपेज द्वारे  आम्हाला जास्तीत जास्त गरजु गोर-गरीब मुलांपर्यंत माहिती पोहचवण्याचे कामे चालु आहे. कॉम्प्युटरच शिक्षण आम्ही आमच्या संस्थेत मुलांना देऊन त्यांना  त्यांची जिवनशैली कशी घडवावी याबद्दल मार्गदर्शन करत असतो. सामाजीक ओढ असल्या कारनाने वेगवेगळया ठिकानी आमचे केंद्र स्थापन करून आम्ही आमच्या संस्थेमार्फत प्रशिक्षण व महिती पुरवण्याचे कामे चालु आहे.

आमची प्रशिक्षण केंद्रे

1.Samarpan College of computer education Navapur, Nandurbar – 425417

2.Bless college of computer education Visarwadi, Navapur, Nandurbar – 425426

3. Seva Computer Education Nandurbar – 425412

4. Rahobat Computer Institute Dhadgaon, Nandurbar – 425414

5.Vaishnavi Computer Education Akkalkuwa, Nandurbar – 425419